मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची आज मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीमध्ये राज्यातील पीक पाण्यासह दुष्काळी परिस्थितीचाही आढावा घेण्यत आली. या बैठकीत मराठवाड्यात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. राज्यातीस 1345 हेक्टर क्षेत्र सिंचित करण्यात येणार आहे. तर बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्राम पंचायत योजनेलाही मुदतवाढ देण्यात आली आहे. 1 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट्य गाठण्यासाठी विविध 341 शिफारशी करण्यात आल्या आहेत.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेले संक्षिप्त निर्णय
मंगरूळपीर येथील सत्तर सावंगी बॅरेजला मान्यता. 1345 हेक्टर क्षेत्र सिंचित होणार ( जलसंपदा विभाग)
राज्यातल्या ग्रामपंचायत इमारतीच्या कामांसाठी निधी वाढवला
बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्राम पंचायत योजनेलाही मुदतवाढ
( ग्रामविकास विभाग)
आता शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात. मार्गदर्शक तत्त्वांना मान्यता
( उच्च व तंत्रशिक्षण)
राज्य आर्थिक सल्लागार परिषदेच्या अहवालाचे सादरीकरण.
1 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट्य गाठण्यासाठी विविध 341 शिफारशी ( नियोजन विभाग)
दांडी मारणारे मंत्री
छगन भुजबळ अदिती तटकरे हसन मुश्रीफ अनिल पाटील अब्दुल सत्तार संजय राठोड शंभूराज देसाई उदय सामंत अतुल सावे सुरेश खाडे राधाकृष्ण विखे पाटील रवींद्र चव्हाण
धर्मरावबाबा आत्राम संजय कुमार बनसोडे संदीपान भुमरे गुलाबराव पाटील
कॅबिनेटला हजर मंत्री
एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार दिलीप वळसे पाटील धनंजय मुंडे दादा भुसे तानाजी सावंत विजयकुमार गावीत चंद्रकांत पाटील दीपक केसरकर मंगलप्रभात लोढा सुधीर मुनगंटीवार