अर्बन बँकेच्या पाच लाखांपर्यंत ठेवी परत करण्यात आलेल्या आहेत. आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ज्या ठेवीदारांच्या मुदत ठेव पावतीची पूर्ण रक्कम डीआयसीजीसी मार्फत थेट ठेवीदारांच्या खात्यात जमा झालेली आहे, त्या ठेवीदारांच्या मूळ ठेव पावत्या रद्द झालेल्या आहेत. संबंधित ठेवीदारांनी पाच लाखांपुढील रक्कमेसाठी बँकेच्या शाखाधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन बँक प्रशासक यांच्यावतीने करण्यात आले आहे.
अर्बन बँकेच्यावतीने करण्यात आलेल्या आवाहनात आरबीआयच्या मार्गदर्शक सुचनांनुसार ज्या ठेवीदारांच्या मुदत ठेव पावतीची पूर्ण रक्कम डीआयसीजीसी मार्फत थेट खात्यात जमा झालेली आहे, त्या ठेवीदारांकडील मूळ ठेवीच्या पावत्या रद्द झाल्या आहेत. तसेच ज्या ठेवीदारांच्या मुदत ठेवीची रक्कम 5 लाखांपेक्षा जास्त आहे व ज्यांना डीआयसीजीसी मार्फत रुपये 5 लाख प्राप्त झालेले आहेत, अशा ठेवीदारांनी त्वरीत आपली मुदत ठेव पावती नजीकच्या शाखेत शाखाधिकार्यांना दाखवून त्यावर उर्वरित रकमेची नोंद करून घ्यावी, तसेच याबाबत अधिक माहितीसाठी नजीकच्या बँक शाखेशी अथवा मुख्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन बँकेचे अवसायक गणेश गायकवाड यांनी केले आहे.