Sunday, December 8, 2024

राज्यसभेतील 12 जागांचे उमेदवार बिनविरोध, भाजप आता राज्यसभेतील सर्वात मोठा पक्ष

राज्यसभेमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. एनडीएचे 11 सदस्य राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेले आहेत. त्यामुळे राज्यसभेतील एनडीएचे सदस्य संख्या आता 115 वरती गेली आहे. 96 सदस्यासह भाजप राज्यसभेत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. राज्यसभेच्या 12 जागांसाठी पोटनिवडणूक पार पडली. या सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. 12 पैकी एनडीए ला 11 जागांवर विजय मिळाला असून एका जागेवर काँग्रेसने विजय मिळाला आहे. त्यामुळे आता राज्यसभेत भाजपच स्थान आणखी मजबूत झालं आहे. एनडीए आघाडीकडे आता पूर्ण बहुमत आहे. आता राज्यसभेत कोणतही विधेयकं मंजूर करुन घेताना मोदी सरकाला फार अडचणी येणार नाहीत. आता मोदी सरकारकडे मोठं बहुमत आहे.

राज्यसभेच्या 12 जागांसाठी पोटनिवडणूक पार पडली. त्या 12 जागांमध्ये भाजपाचे 9 आणि सहकारी पक्षाचे 2 सदस्य यांची बिनविरोध निवड झाली आहे. काँग्रेसकडून अभिषेक मनु सिंघवी यांनी राज्यसभेची निवडणूक जिंकली आहे. राजस्थानमधून भाजपाचे रवनीत सिंह बिट्टू, हरियाणामधून किरण चौधरी, मध्य प्रदेशातून जॉर्ज कुरियन आणि बिहारमधून मनन कुमार मिश्रा यांची बिनविरोध निवड झाली आहे. बिहारमधून एनडीएचा भाग असलेल्या राष्ट्रीय लोक पार्टीचे नेते उपेंद्र कुशवाहा देखील विजयी झाले आहेत.

निवडणूक आयोगाने राज्यसभा पोटनिवडणुकीची घोषणा केली होती. पोटनिवडणुकीसाठी 3 सप्टेंबरला मतदान पार पडणार होतं. तर निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट होती. अर्ज मागे घेण्यासाठी 27 ऑगस्ट होती. निवडणूक पार पडण्याआधीच सर्व सदस्यांची बिनविरोध निवड झाल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. राज्यसभेचं संख्याबळ 245 आहे. यात आठ जागा रिकामी आहेत. यात जम्मू-काश्मीरच्या चार जागा आहेत. सध्या सदनाच संख्याबळ 237 आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles