अहमदनगर (प्रतिनिधी)- कोणत्याही समाजाचा नामोल्लेख व उद्देशून नसलेल्या त्या व्हिडिओ वरुन सुशांत म्हस्के यांच्यावर तोफखाना पोलीस स्टेशनला सूडबुद्धीने दाखल करण्यात आलेला गुन्हा मागे घेण्याची मागणी ऑल इंडिया पँथर सेना व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) च्या वतीने करण्यात आली आहे.
या मागणीचे निवेदन शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिले. यावेळी पँथर सेनेचे शहर जिल्हाध्यक्ष अतुल भिंगारदिवे, रिपाई शहर कार्याध्यक्ष दानिश शेख, गुलाम शेख, नईम शेख, जुबेर शेख, संदीप वाघचौरे, अझीम खान, सुफीयान शेख, आदिल शेख, सोहेल शेख, यासर पैलवान, वसीम शेख, विजय शिरसाठ, महिला शहराध्यक्षा ज्योती पवार, माया गायकवाड, अलका जाधव, माया जाधव, अर्चना जगताप, सुमन साळवे, मंगल चांदणे, सविता पाटोळे, मैना शिंदे, अमृता पवार, सुशिला भाकरे, संगीता पाटोळे, सारिका गांगुर्डे, पूजा साठे, मनिषा गायकवाड, यमुना उल्हारे, संजना गायकवाड, सविता गायकवाड, अलका भाकरे, हुसेन चौधरी, इकराम शेख, जमीर शेख, निजाम शेख, जावेद सय्यद, सज्जाद शेख, अनिकेत पवार, अमोल साळवे, अंकुश मिरकुटे, वसीम शेख, आफताब बागवान, चिकू गायकवाड, सुधीर गायकवाड आदी उपस्थित होते.
14 सप्टेंबर रोजी तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये सुशांत म्हस्केयांच्यावर मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य व शिवीगाळ करुन समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. म्हस्के यांच्या व्हिडिओ मध्ये कोणत्याही समाजाचा नाव घेतलेला नाही. सदर व्हिडिओ मध्ये शिवीगाळ असून, परंतु त्यामध्ये मराठा अथवा कोणत्याही समाजाचा उल्लेख नाही. मागासवर्गीय समाजाबद्दल काहींनी वाघाच्या शर्यतीत कुत्रे पुढे नाचायला लागली, रेशनवर जगणारे तुम्ही आमची काय बरोबरी करणार, आरक्षणामुळे माजलेत या पध्दतीने कमेंट केले होते. त्या जातीयवादी प्रवृत्तींना अनुसरुन तो व्हिडिओ असल्याचा खुलासा संघटनांच्या वतीने करण्यात आला आहे.
म्हस्के हे रिपाईचे शहर जिल्हाध्यक्ष असून, या व्हिडिओला वेगळे वळण देवून त्यांचे राजकीय अस्तित्व संपण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. संपूर्ण व्हिडिओ पडताळून पाहता, त्या व्हिडिओत कोणत्याही समाजाचा व धर्माचा उल्लेख केलेला नाही. हा गुन्हा राजकीय हेतूने कोणाच्या तरी सांगण्यावरून दाखल करण्यात आलेला असल्याचे म्हंटले आहे.
मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य,सुशांत म्हस्केवरील गुन्हा मागे घ्यावा
- Advertisement -