प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्यावर कायद्यानुसार दाखल करण्यात आला आहे. वादग्रस्त वक्तव्या प्रकरणी इंदुरकरी महाराजांवर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी आज संगमनेर जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. या प्रकरणी इंदुरीकर महाराज स्वतः कोर्टात हजर राहाणार का? हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे
अपत्य प्राप्ती संदर्भात फेब्रुवारी २०२० मध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्यावर जुलै २०२० मध्ये PCPNDT कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या वक्तव्यावर आक्षेप घेत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी इंदुरीकरांवर कारवाईची मागणी केली होती. मात्र, जिल्हा न्यायालयाने इंदुरीकरांना गुन्ह्यातून मुक्त केल्यानंतर अंनिसने औरंगाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली होती.उच्च न्यायालयाने गुन्हा दाखल करून इंदुरीकर महाराजांविरोधात खालच्या कोर्टात खटला चालवण्याचा आदेश दिला. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती मिळावी यासाठी इंदुरीकरांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
मात्र, सर्वोच्च न्यायालयाने गुन्हा रद्द करण्याची याचिका फेटाळत उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. यानुसार इंदुरीकर महाराजांवर दाखल प्रकरणाची संगमनेर जिल्हा व सत्र न्यायालयात आज सुनावणी होणार आहे या सुनावणीसाठी इंदोरीकर महाराज स्वतः हजर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.