देशामध्ये कांद्याची उपलब्धता वाढावी तसेच, कांद्याच्या दरांवर नियंत्रण राहावे या हेतूने केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. ही निर्यातबंदी ३१ मार्च २०२४पर्यंत लागू असणार आहे. विदेश व्यापार महासंचालक कार्यालयाने (डीजीएफटी) शुक्रवारी एका अधिसूचनेद्वारे ही माहिती दिली.
देशात अनेक ठिकाणच्या बाजारांत कांद्याचा दर प्रतिकिलो ७० ते ८० रुपयांवर पोहोचला आहे. यंदाच्या खरीप हंगामात पुरेसे पीक न आल्याने बाजारात कांद्याचा ओघ आटला असून त्यातून त्याचा दर नियंत्रणाबाहेर गेला आहे. कांद्याचे दर आटोक्यात राहावे, यासाठी केंद्र सरकारने यापूर्वीही अनेक उपाय जाहीर केले होते. याचाच एक भाग म्हणून आता निर्यातबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.
लासलगाव, मुंगसे, झोडगे, येवला, चांदवड, वणी, कळवण, निफाड, देवळा येथे संतप्त शेतकऱ्यांचा रास्तारोको