तुम्ही छगन भुजबळांच्या मांडीला मांडी लावून कसे बसलात? असं म्हणत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. दरम्यान, राज ठाकरे यांच्या टीकेनंतर मंत्री छगन भुजबळांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीतून जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
भुजबळ म्हणाले, उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला तसा प्रश्न राज ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना देखील विचारला पाहिजे. एकनाथ शिंदे बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे म्हणतात, मग छगन भुजबळ आता तुमच्या मांडीला मांडी लावून का बसतोय? राज ठाकरेंनी हे विचारलं पाहिजे.
पुढे बोलताना भुजबळ म्हणाले, माझ्याबद्दल ही सगळी मंडळी बोलतात. मी शिवसैनिक असेल. फार कट्टर नव्हतो असं समजूयात. अरे तुम्ही रक्ताचे होतात. मला आठवतं की, राज आला नाही, राज आला नाही. तोपर्यंत ते जेवायचे नाहीत. शाळेतून अजून कसा आला? असं मातोश्रीवर विचारलं जायचं. तुम्ही असं काय केलंत? तुम्ही इकडं पण असता तिकडं पण असता, असा टोलाही भुजबळांनी ठाकरेंना लगावला.