मंत्रिपद न मिळाल्यानं ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नाराज असल्याचं पाहायला मिळालं. मात्र, नाराज भुजबळांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दखल घेतली आहे. छगन भुजबळ यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यसभेवर पाठवण्यात येणार आहे. नुतन मंत्री मकरंद पाटील यांचे भाऊ खासदार नितीन पाटील यांच्या जागी भुजबळांना राज्यसभा देण्यात येणार असल्याची माहिती आहे . एबीपी माझाने सदर वृत्त दिले आहे.
या आधी भुजबळांनी राज्यसभेवर जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. तीच बाब लक्षात घेत पक्षाकडून भुजबळांना राज्यसभेवर पाठवण्याची तयारी सुरु झाली आहे.
राजकीय लढाईत लढण्यासाठी छगन भुजबळांची गरज मात्र ज्यावेळी मंत्रिपदाची संधी द्यायची वेळ आली त्यावेळी थेट डावलणं योग्य नसल्याची भावना देखील व्यक्त करण्यात आली. राज्यात आमदारांची घरं जळत असताना ओबीसींच्या घरांवर हल्ले होत असताना सगळे ओबीसी नेते गायब होते. त्यावेळी महायुतीसाठी एकट्यानं लढाई लढून सत्ता अणण्यास मदत केली. मात्र, आता संधी द्यायच्या वेळी दुर्लक्ष केल्याने भुजबळांची नाराजी असल्याचं कळतंय.