अश्लील चाळ्यांसाठी तरुण तरुणींना जागा उपलब्ध करून देणाऱ्या कॅफेची भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी तोडफोड केल्याचा प्रकार चाळीसगाव शहरात उघडकीस आला आहे. भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी पोलिसांना सोबत घेत केलेल्या छापेमारीत प्रकार समोर आल्यानंतर आमदार मंगेश चव्हाण यांनी थेट कॅफेची सहकाऱ्यांसोबत तोडफोड केली. कॅफे चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी केली जात आहे. त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
https://x.com/mlamangeshbjp/status/1739640083010240592?s=20
चाळीसगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या एका अनाधिकृत कॅफेमध्ये तरुण तरुणींना अनैतिक कृत्य करण्यासाठी कॅफे मालकाडून जागा उपलब्ध करून दिली जात असल्याची माहिती पोलिसांसह आमदर मंगेश चव्हाण यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकासह – आमदार मंगेश चव्हाण यांनी या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता, अंधारात काही तरुण-तरुणी आढळून आल्याचं दिसून आले. या घटनेनंतर संतप्त झालेल्या आमदार मंगेश चव्हाण यांनी या कॅफेची स्वतःच तोडफोड केल्याने खळबळ उडाली आहे.