आगामी विधानसभा निवडणुकीत याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून भाजप नेते कामाला लागले आहेत. निवडणुकीपूर्वी त्यांनी विरोधी पक्षांचे नेते गळाला लावण्यास सुरुवात केली आहे. झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि जेएमएम पक्षाचे नेते चंपाई सोरेन हे भाजपमध्ये प्रवेश करणार, अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या होत्या.
याबाबत आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. चंपाई सोरेन यांचा भाजप (BJP) प्रवेशाचा मुहूर्त ठरला आहे. येत्या 30 ऑगस्ट रोजी राची येथे सोरेन भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. सोमवारी (ता २६) रात्री चंपई सोरेन यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली.
या भेटीत त्यांनी भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब केलं आहे. आसामचे विद्यमान मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ट्वीट करून यासंदर्भातील माहिती दिली. हिमंता बिस्वा सरमा यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत चंपाई सोरेन यांच्या भेटीचा फोटो देखील पोस्ट केला आहे.
https://x.com/himantabiswa/status/1828129586640744656?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1828129586640744656%7Ctwgr%5Eefb4871bdad469e8c433426746d2bbabde4c9dbb%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fsaamtv.esakal.com%2Fnational-international%2Fvidhan-sabha-elections-2024-former-jharkhand-cm-champai-soren-to-join-bjp-on-30-august-2024-a-big-blow-to-jmm-party-ssd92