चाणक्य सांगतात की नवऱ्याने बायकोला काही गोष्टी कधीच सांगू नये. त्या गोष्टी कोणत्या,
आचार्य चाणक्य यांच्या मते, नवऱ्याने बायकोला त्याची कमतरता कधीच सांगू नये. नवरा बायकोच्या नात्यात छोटे मोठे वाद होत असतात अशावेळी रागाच्या भरात बायको नवऱ्याचा कमतरतेचा उल्लेख करू शकते.
चाणक्य नीतीमध्ये सांगितल्याप्रमाणे, नवऱ्याने बायकोला त्याची कमाई कधीच सांगू नये. जर पत्नीला नवरा किती कमावतो, हे माहिती पडले तर ती पैशांचा हिशोब घेऊ शकते किंवा बायको अति खर्च करणारी असेल तर याचा गैरफायदा घेऊ शकते.
जर तुम्ही काही दान केले असेल तर तुमच्या दानाविषयी कुणालाच सांगू नये, अन्यथा दान केलेलं वाया जातं, असं म्हणतात. चाणक्य सांगतात की तुम्ही दान केले हे पत्नीला सुद्धा कधीही सांगू नये.