धार्मिकस्थळी दान करताना पैशाचा विचार करू नये. पवित्र स्थानी दान केल्यानंतर पुण्य मिळते, असे चाणक्य सांगतात. धार्मिकस्थळी जो पैसा जमा केला जातो त्या पैशातून भक्त, गरजू लोकांना अनेक सुविधा दिल्या जातात आणि गरिबांना अन्नदान केले जाते.
गरीब आणि गरजू लोकांना मदत करण्यासाठी नेहमी तयार असावे. चाणक्य नीती सांगते की, अन्न, वस्त्र किंवा शिक्षणासाठी गरीब आणि गरजू लोकांवर पैसा खर्च केल्यामुळे तुमची तिजोरी कधीच रिकामी होत नाही, देव तुम्हाला तुमच्या चांगल्या कामाचे फळ देते
चाणक्य सांगतात की, माणसाने आपल्या कमाईतून काही पैसे समाजासाठी दान केले पाहिजे. समाजाप्रती आपले कर्तव्य निभावण्यासाठी प्रत्येकाने समाजासाठी चांगले कार्य करणे अपेक्षित आहे.
चाणक्य नीती सांगते, जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम आहात, तर आजाराने त्रासलेल्या गरजू व्यक्तीला मदत करावी. अनेकदा पैसे नसल्यामुळे अनेक लोकांना आजारांवर योग्य उपचार करता येत नाही