चाणक्य यांनी त्यांच्या नीतीतून विद्यार्थ्यांनाही मार्गदर्शन केले आहे. चाणक्य सांगतात की काही गोष्टी विद्यार्थ्यांसाठी अत्यंत फायदेशीर आहेत. या गोष्टींचे अनुकरण विद्यार्थ्यांनी केले, तर ते त्यांच्या आयुष्यात नेहमी यशस्वी होतील.
चाणक्य नीतीनुसार, विद्यार्थ्यांनी शिस्तप्रिय असायला हवे. त्यांनी वेळेचा सदुपयोग करावा आणि आपले उद्दिष्ट ठरवावे. विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त असेल, तर त्यांना भरपूर यश मिळू शकते.
चाणक्य सांगतात की, कठीण परिश्रम घेतले की, यश मिळते. विद्यार्थ्यांनी नेहमी भरपूर मेहनत घेतली पाहिजे. ज्ञान मिळवण्यासाठी आणि स्वत:मधील कौशल्य सुधारण्याकरिता सतत प्रयत्न केले पाहिजेत.
चाणक्य नीतीमध्ये सांगितल्याप्रमाणे, विद्यार्थ्यांनी सतत काहीतरी नवीन शिकावे. विद्यार्थ्यांमध्ये नेहमी नवीन शिकण्याची इच्छा असावी. नवनवीन विषयांमध्ये आपल्या ज्ञानाचा विस्तार करावा. एवढेच काय तर शिक्षकांपासून मार्गदर्शन घ्यायला हवे.
विद्यार्थ्यांनी फक्त पुस्तकी ज्ञान नाही, तर इतर अनेक शालेय उपक्रमांत सहभाग घ्यावा. संवादकौशल्याला अधिक महत्त्व द्यावे. सार्वजानिक चर्चासत्रात सहभाग घ्यावा.
विद्यार्थ्यांमध्ये भरपूर आत्मविश्वास असायला पाहिजे, असे चाणक्य सांगतात. विद्यार्थ्यांनी त्यांच्या क्षमतेवर विश्वास ठेवायला पाहिजे. त्यांच्या विचार आणि दृष्टिकोनात नेहमी सकारात्मकता ठेवून, स्वक्षमतेवर विश्वास ठेवावा.