धक्कादायक… विद्यापीठातील ६० विद्यार्थ्यांनींचे आंघोळ करतानाचे व्हिडिओ व्हायरल…

0
1770

धक्कादायक बातमी समोर आली आहे. पंजाब राज्यातील मोहाली येथे चंदीगड युनिव्हर्सिटीमधील ६० विद्यार्थीनींचे आंघोळ करतानाचे व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्याच विद्यापिठातील एका विद्यार्थिनीनं इतर विद्यार्थिनींचा आंघोळ करताना व्हिडीओ काढून व्हायरल केल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, या प्रकरणात आंघोळीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काही तरुणींनी आत्महत्या केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. याबाबत पोलिसांनी स्पष्टीकरण देत कोणत्याही तरुणीनं आत्महत्येचा प्रयत्न केला नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

या प्रकरणावरून विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी विद्यापीठ परिसरात एकच गोंधळ घातला. यानंतर एमएमएस बनवणाऱ्या तरुणीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. पोलिसांनी या तरुणीविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. आरोपी तरुणी अनेक दिवसांपासून विद्यार्थिनींचे अंघोळ करतानाचा व्हिडीओ बनवत होती आणि तिच्या ओळखीच्या तरुणाला पाठवत होती. या तरुणाने हे व्हिडीओ इंटरनेटवर टाकले होते. त्यानंतर हे व्हिडीओ व्हायरल झाले.