Saturday, April 26, 2025

गैरव्यवहारामुळे पूर्वीच्या सरपंचाचे पद रद्द ! नगरमधील ‘या’ ग्रामपंचायतच्या सरपंच पदी महिलेची बिनविरोध निवड

खांडके ग्रामपंचायतच्या सरपंचपदी चंद्रकला चेमटे बिनविरोध
गैरव्यवहारामुळे पूर्वीच्या सरपंचाचे पद रद्द झाल्याने नव्याने झाली निवड
नगर – नगर तालुक्यातील खांडके ग्रामपंचायतच्या सरपंच पदी चंद्रकला यमाजी चेमटे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या पूर्वीचे सरपंच पोपट सोन्याबापू चेमटे व ग्रामसेवकाने संगनमताने केलेला आर्थिक गैरव्यवहार चौकशीत सिध्द झाल्याने नाशिक विभागीय आयुक्तांनी सरपंच पोपट चेमटे यांचे पद नुकतेच रद्द केले होते. त्यामुळे या रिक्त पदावर ही निवड करण्यात आली आहे.
सरपंच निवडीसाठी निवडणुक निर्णय अधिकारी तथा भिंगारचे मंडल अधिकारी संतोष झाडे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यांची विशेष सभा झाली. या सभेस निरीक्षक म्हणून नायब तहसीलदार अनिल तोरडमल उपस्थित होते. त्यांना ग्रामसेवक भाऊसाहेब पालवे, तलाठी अविनाश झांबरे यांनी सहाय्य केले. या सभेस उपस्थित ग्रामपंचायत सदस्य गोरख पवार, अर्जुन ठोंबे, अनुराधा पवार यांनी सरपंच पदी चंद्रकला यमाजी चेमटे यांची बिनविरोध निवड केली.
या निवडीनंतर सरपंच चेमटे यांचा सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब चेमटे, व्हाईस चेअरमन संतोष मचे, बाजार समितीचे संचालक भाऊसाहेब ठोंबे, माजी सरपंच सुखदेव टांगळ, देविदास टांगळ, भीमा पवार, बाळू मचे, संदीप मचे, संभाजी चेमटे, शांताराम चेमटे, धोंडीराम पवार,भगवान ठोंबे, कारभारी चेमटे, दत्तू चव्हाण, रमेश चव्हाण, प्रकाश चव्हाण, भानुदास टांगळ, कांतीलाल टांगळ, अर्जुन टांगळ, एकनाथ साबळे, रावसाहेब साबळे, मोहन ठोंबे, रवि ठोंबे, प्रवीण ठोंबे, मोहसीन शेख, समीर देशमुख, बबन चेमटे, बाळू ठोंबे, गुलाब पठाण, मुबीन देशमुख, अलीम देशमुख, युनुस देशमुख, वारूळवाडीचे माजी सरपंच अर्जुन साठे, सरपंच सागर कर्डिले, पोखर्डीचे ग्रामपंचायत सदस्य राहुल वारुळे यांच्या सह ग्रामस्थांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांनीही नवनिर्वाचित सरपंच चंद्रकला चेमटे यांचा सत्कार केला.
दरम्यान सरपंच पद रद्द झालेले पोपट चेमटे यांचे ग्रामपंचायत सदस्यपदही रद्द करण्यात यावे याबाबत जिल्हा न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली असल्याचे तक्रारदार किरण चेमटे यांनी सांगितले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles