वंचित बहुजन आघाडीचे नेते माजी खासदार प्रकाश आंबेडकर हे चंद्रपुरात होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधतांना अनेक विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले, उद्धव ठाकरेंनी कल्याणची जागा एकनाथ शिंदे यांच्यासाठी सोडली आहे. राष्ट्रवादीने पाचवेळा निवडणुकीत पराभूत झालेल्या व्यक्तीला उमेदवारी देऊन पंकजा मुंडे यांच्यासाठी बीडची जागा सोडली आहे. अशा अनेक जागा आहेत. याचा नेमका अर्थ काय, याचा आपण विचार केला पाहिजे. नवा कार्यकर्ता, मतदारसंघात नवा उमेदवार सताना, त्याला डावलून नेहमीच पराभूत झालेल्या उमेदवारांनाच पुन्हा संधी देत आहोत. मी तुम्हाला वीस मतदारसंघांची नावे सांगू शकतो जिथे उमेदवारांची फिक्सिंग झालीये, असा गंभीर आरोप आंबेडकरांनी केला.