अहमदनगर -मनमाड रोड वरील वाहतूकीत बदल, पर्यायी वाहतूक मार्ग
नगर-मनमाड रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सध्या वेगात सुरू आहे. त्यामुळे या रस्त्यावरील विळद बाह्यवळण ते पुणतांबा फाटा या रस्त्यावरील अवजड वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे. ही अवजड वाहनांची वाहतूक रविवार (१ सप्टेंबर) सकाळी ८ ते रविवार (८ सप्टेंबर) रात्री ८ वाजेपर्यंत इतर मार्गांवरून वळवण्यात येणार आहे.
वाहतुकीचा मार्ग
नगर, पुणे, सोलापूर कडून मनमाडकडे
कल्याण बाह्यवळण चौक – नगर-कल्याण महामार्गावरून आळेफाटा – संगमनेर मार्गे नाशिक
विळद घाट – दूध डेअरी चौक – शेंडी बाह्यवळण – नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरून कायगाव – गंगापूर – वैजापूर – येवला मार्गे इच्छित स्थळी
शनिशिंगणापूर, सोनई रस्त्यावरून मनमाड (राहुरीकडे) येणारी सर्व प्रकारच्या अवजड वाहतूक नगर- छत्रपती संभाजीनगर मार्गावरून इच्छित स्थळी
मनमाड, येवला, शिर्डीकडून नगरकडे
पुणतांबा फाटा – झगडे फाटा – सिन्नर – नांदूर शिंगोटे – संगमनेर – आळेफाटा मार्गे नगर
मनमाड, येवलाकडून नगर, सोलापूर, बीडकडे
पुणतांबा फाटा येथून वैजापूर – गंगापूर – कायगाव – प्रवरासंगम – शेंडी बाह्यवळण – विळद घाट – केडगाव बाह्यवळण मार्गे
लोणी, बाभळेश्वर, श्रीरामपूर कडून नगरकडे
बाभळेश्वर, श्रीरामपूर, टाकळीभान, नेवासा मार्ग नगर