Saturday, January 25, 2025

नगर जिल्ह्यात ‘अटल भूजल’ योजनेच्या रथाचे प्रस्थान, सिईओ आशिष येरेकर म्हणाले….

अहमदनगर -महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीचे ‍ औचित्य साधून जिल्हा परिषदेच्या आवारातुन ‘ अटल भूजल’ योजनेच्या रथाच प्रस्थान
जिल्ह्यातील अटल भूजल योजनेतील भूजल ग्राम समृध्द स्पर्धेत सहभाग नोंदवणाऱ्या 64 गावांची पुर्वतयारी तसेच क्षमता बांधणी करणे कामी माहिती देणाऱ्या चित्ररथाचे उद्घाटन .मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प अहमदनगर आशिष येरेकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले . या प्रसंगी उपमुख्यकारी अधिकारी श्री राहुल शेळके, जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी

दशरथ दिघे, शिक्षण अधिकारी पाटील , अजिंक्य काटकर वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
विकास यंत्रणा अहमदनगर यांनी या वर्षीच्या भूजल ग्राम समृध्द योजनेत सहभागी झालेल्या कर्जत राहता व संगमनेर येथील गांवांची पुर्वतयारी तसेच क्षमता बांधणी करणे कामी माहिती चित्ररथासह संवादतज्ञ व भूवैज्ञानिक यांच्या चमूला स्पर्धेत सहभागी प्रत्तेक गावांत पोहचून जास्ती जास्त जन-जल जागृती करण्याचे ‍ निर्देश दिले आहेत. भूजल समृध्द ग्राम योजनेत गुणवत्ता यादीत पहिले, दुसरे व तिसरा क्रमांक मिळवणाऱ्या गावांना अनूक्रमे रूपेय 50 लक्ष, 30 लक्ष व 20 लक्ष (जिल्हास्तर) व रूपये 1 कोटी, 50 लक्ष व 30 लक्ष (राज्यस्तर) आसा विकास निधी पारितोषीकाच्या रूपाने उपलब्ध होणार आहे.

माहिती चित्ररथाच्या व्दारे, अटल भूजल योजनेत समाविष्ठ असलेल्या गावांत प्रबोधना व्दारे गावाची भूजल विषयी स्थिती, प्रत्येक गाववांर पाण्याचा ताळेबंद, अटल भूजल योजनेतून साकारलेल्या उपचारांची माहिती तसेच या वर्षीच्या नियोजीत आराखड्यातून प्रस्तावीत कामांची माहिती गावपातळीपर्यंत पारदर्शी पध्दतीने पोचवण्याचे उद्दिष्ट भूजल विभागाचे आहे.असे अवहान अजिंक्य काटकर यांनी केले आहे.

भूजल समृध्द ग्राम योजनेत सहभागी गावासाठी पुरस्काराचे स्वरूप राज्यस्तर प्रथम क्रमांक रूपये 1 कोटी व जिल्हा स्तरीय प्रथम पुरस्कार हा रूपये 50 लक्ष आहे. दुसऱ्या क्रमांकाचे व तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार हा अनूक्रमे रूपये 30 लक्ष व 20 लक्ष इतका असून. अहमदनगर जिल्ह्यातील सहाभागी गावांनी प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली परीश्रम घेऊन जास्ती जास्त गुणवत्तेचे प्रदर्शन करावे असे अवहान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles