Tuesday, February 18, 2025

आज जाहीर होणार दहावीचा निकाल, या अधिकृत वेबसाईटवर पाहा निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 27 मे म्हणजेच सोमवारी दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. दहावीची परीक्षा दिलेले विद्यार्थी आणि त्यांचे पालक निकाल लागण्याची वाट पाहत होते. अखेर त्यांची ही प्रतीक्षा सोमवारी संपणार आहे. सोमवारी दुपारी १ वाजता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल ऑनलाईन पाहायला मिळणार आहे. mahresult.nic.in या वेबसाईटवर विद्यार्थी निकाल पाहू शकतात. त्याचसोबत डिजीलॉकरवर देखील विद्यार्थी निकाल पाहू शकतात.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दहावीची परीक्षा घेण्यात आल्या होत्या. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात दहावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. राज्यात जवळपास १६ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. दहावीची परीक्षा ९ विभागीय मंडळांतर्फे म्हणजेच पुणे, नागपूर, औरंगबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, लातूर, नाशिक आणि कोकण येथे आयोजित करण्यात आली होती. सोमवारी दहावीचा निकाल जाहीर होणार आहे.
या अधिकृत वेबसाईटवर पाहा निकाल –
– https://mahresult.nic.in/

– https://sscresult.mkcl.org/

– https://sscresult.mahahsscboard.in/

– https://results.digilocker.gov.in/

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles