Sunday, June 15, 2025

video : दबा धरून बसलेले चित्ता आणि हरणामध्ये झटापट,शेवटी या लाढाईत कुणाचा विजय

‘शिकार करो या शिकार बनो’ हा जंगलात जगण्याचा नियम आहे. जर तुम्हाला शिकार करता येत नसेल तर सुरक्षित राहण्याची कला शिकून घ्यायलाच हवी.अन्यथा तुमची काही खैर नाही. जंगलात कोणीही सुरक्षीत नसतं. जंगली प्राण्यांच्या झुंजीचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. जंगलात त्याच प्राण्यांची चालते, त्यांच्यामध्ये बळ किंवा शक्ती असते. इतर कमी ताकदीचे प्राणी मोठ्या किंवा शक्तीशाली प्राण्यांना बळी पडतात. आपण नेहमी पाहतो, की वाघ, सिंह, बिबट्या किंवा चित्ता यासारखे प्राणी अत्यंत घातक असतात. दूरवरूनही ते शिकार ओळखतात आणि काही क्षणात त्यांचा फडशा पाडतात. त्यांचा वेग इतका असतो, की बहुतेकवेळा शिकार पळून जाण्यात अपयशी ठरतो. हे प्राणी गवत खात असताना त्याच गवतात वाघ, सिंह, चित्त्यासारखे प्राणी दबा धरून बसलेले असतात. अचानक झडप घालतात आणि आपली पेटपूजा करतात. पण कधीकधी आश्चर्यकारक घडते ज्यावर आपला विश्वास बसणार नाही. एक चित्ता आणि हरीण यांचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

हा व्हीडिओ आहे चित्ता आणि हरणाचा चित्ता हरणाची शिकार करण्यासाठी येतो आणि मग पुढे काय होतं हे या व्हीडिओत पाहायला मिळतं. हरिण पुढे धावतं. त्याच्या मागे चित्ता… असं ते धावत असतात. चित्ता हरणाची शिकार करण्यासाठी आपली सर्व ताकद एक करून हरणाच्या मागे धावताना दिसून येतोय. हरणाच्या धावण्याचा वेग जास्त असतो. त्याला पकडण्यासाठी चित्त्यांची दमछाक होते. पण चित्तादेखील आपली शिकार काही सोडण्याला तयार नसतो. शेवटी या लाढाईत कुणाचा विजय होतो हे तुम्हीच पाहा.
https://x.com/AMAZlNGNATURE/status/1793170937384149050?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1793170937384149050%7Ctwgr%5Eccd455303a39511d06dfb90f70bb3b21d0ea5d60%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Ftrending%2Fcheetah-attack-deer-viral-video-when-the-cheetah-chased-the-deer-they-jumped-in-the-air-and-started-crossing-the-road-you-will-be-surprised-to-see-the-sight-srk-21-4389111%2F

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles