चित्ता हा सर्वात वेगवान प्राणी आहे. तो ताशी ८० ते १२० प्रती कि.मी. वेगाने पळू शकतो. त्यामुळे समोरील प्राणी कितीही वेगवान असला तरी तो चित्त्याचा सामना करू शकत नाही. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल चक्क एका मगरीनं चित्त्याशी पंगा घेतला आहे. मगर ही सर्वात खतरनाक प्राण्यांपैकी एक आहे. एका हल्ल्यात तो समोरच्या प्राण्याचे अक्षरश: दोन तुकडे करते. त्यामुळेच मगरीला किलिंग मशीन असं सुद्धा म्हणतात.सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओंमधून दिसून येतं की, जंगलात अशक्य असं काहीही नाही. जंगलातील काही दृश्य पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. बिबट्याचे व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात. आता सोशल मीडियावर एका तहानलेल्या चित्त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. कारण तहानलेल्या चित्त्याला काही सेकंदात आपला जीव गमवावा लागला आहे.
‘शिकार करो या शिकार बनो’ हा जंगलात जगण्याचा नियम आहे. जर तुम्हाला शिकार करता येत नसेल तर सुरक्षित राहण्याची कला शिकून घ्यायलाच हवी.अन्यथा तुमची काही खैर नाही. जंगलात कोणीही सुरक्षीत नसतं. अगदी चित्ता सुद्धा. जंगलात प्रत्येक प्राण्याला त्याची स्वत:ची सुरक्षा करण्यासाठी खूप अलर्ट राहावं लागतं. असाच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे.