Saturday, March 2, 2024

छगन भुजबळ भाजपाच्या वाटेवर? ‘या’ पोस्टमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन महायुतीत मराठा आणि ओबीसी असे दोन गट पडल्याचं दिसून येत आहे. एकीकडे नेते मराठा आरक्षणाची मागणी करताना दिसत आहेत, तर ओबीसी नेते, छगन भुजबळ मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या विरोधात आहेत.

याच मुद्द्यावरुन छगन भुजबळ पक्षात एकाकी पडल्याची चर्चा सुरु आहे. छगन भुजबळ नाराज असल्याची देखील चर्चा होती. मात्र आता छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती समोर येत आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्वीट करत तसा दावा केला आहे.
अंजली दमानिया यांनी ट्वीट करत म्हटलं की, ‘भुजबळ भाजपच्या वाटेवर? एकेकाळी छगन भुजबळांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध जनहित याचिका करणारा भाजप त्यांना मोठा ओबीसी नेता बनवणार? अशा भ्रष्ट माणसांना मोठं करणार, राजकारणासाठी? कुठे फेडाल हे पाप.’

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles