Tuesday, April 23, 2024

महायुतीत जागा वाटपांची ठिणगी, भुजबळांनी भाजपाविरोधात दंड थोपटले?

राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तथा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील प्रमुख नेते छगन भुजबळ यांनी या फॉर्म्युल्यांवर प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ यांनी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर महायुतीत एकनाथ शिंदे गटाइतक्याच जागा अजित पवार गटाला द्यायला हव्यात असं वक्तव्य केलं आहे. परंतु, भुजबळांची मागणी व्यक्तीगत आहे, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते आणि राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

छगन भुजबळ म्हणाले, ते तुमचे (प्रसारमाध्यमांचे) फॉर्म्युले आहेत. त्यावर मी काय बोलणार? तो आमचा फॉर्म्युला नाही. आम्ही एवढंच सागितलं आहे की, महायुतीत शिवसेनेच्या शिंदे गटाला जितक्या जागा मिळतील तितक्या जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळायला हव्यात. शेवटी तिन्ही पक्षांमधील वरिष्ठ नेते त्यावर निर्णय घेतील. त्यानंतर जो निर्णय घेतला जाईल तो सर्वांना मान्य असेल.
5

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles