अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने माळीवाडा येथे ओबीसींचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांना महायुती सरकारने मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने निदर्शने करण्यात आली
नगर – अहिल्यानगर शहरातील माळीवाडा येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने ओबीसींचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांना महायुती सरकारने मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने येथील महात्मा फुले यांच्या पुतळाजवळ निदर्शने करून काळी फीत लावून सरकार चा जाहीर निषेध करण्यात आला
यावेळी समता परिषेदेचे प्रदेश उपाध्यक्ष अंबादास गारुडकर ,जिल्हाध्यक्ष सुभाष लोंढे ,महानगर अध्यक्ष दत्ता जाधव ,प्रदेश प्रवक्ते डॉ नागेश गवळी ,रामदास फुले ,अनिल निकम ,खंडू भुकन,किसनराव रासकर ,गोरख आळेकर ,मोहित चौधरी ,तुषार भुजबळ , प्रशांत शेरकर ,राजू गाडेकर ,शाहू होले ,संकेत खामकर ,सौरभ भुजबळ ,निशांत शिंदे आदी सह पदाधिकारी उपस्थित होते
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष सुभाष लोंढे म्हणाले कि महायुती सरकार ने मंत्रिमंडळ विस्तार केला यामध्ये जाणीवपूर्वक आमचे नेते छगन भुजबळ यांना डावलण्यात आले . यामुळे पुर्ण राज्यात असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. ज्या जेष्ठ नेत्याचा या सरकारने जो अपमान केला त्याचा बदला समता परिषदेच्या माध्यमातून निश्चितच दाखून दिला जाईल असं इशारा लोंढे यांनी दिला आहे .
यावेळी बोलताना अंबादास गारुडकर म्हणाले कि छगन भुजबळ हे गेली अनेक वर्षापासून ओबीसींच्या मागे भक्कमपणे उभे आहेत ते खरोखर कॊतुकास्पद असेच आहे परंतु या सरकार ला त्यांचे काम योग्य वाटत नसल्याने त्यांना डावलले असल्याची भावना आता सर्वसामान्य जनतेमध्ये निर्माण झाली आहे तरी
यावेळी दत्ता जाधव ,डॉ नागेश गवळी यांनी आपले मनोगत व्यक्त केले
यावेळी काळी फीत बांधून सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला