Saturday, January 25, 2025

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ नाराज; फडणवीस सरकारच्या शपथविधीला गैरहजेरी

नागपूर : महायुती सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी होत आहे. महायुती सरकारच्या ३९ मंत्र्यांचा शपथविधी होत आहे. या सोहळ्याआधी अजित पवारांचं धक्कातंत्र पाहायला मिळालं. नव्या फडवणीस सरकारच्या मंत्र्यांच्या यादीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांचा पत्ता कट झाल्याची माहिती मिळाली आहे. छगन भुजबळ यांचा पत्ता कट झाल्याने ते नाराज झालेत. मंत्रिपद न मिळाल्याने नाराज झालेले छगन भुजबळ यांची शपथविधी सोहळ्याला गैरहजेरी दिसून आली. छगन भुजबळ यांच्या गैरहजेरीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

अजित पवार गटाच्या १० मंत्र्यांचा आज शपथविधी होणार असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, यंदा अजित पवार गटाकडून छगन भुजबळ यांचा डच्चू मिळाला आहे. छगन भुजबळ यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती. मात्र, यंदा छगन भुजबळ यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली नाही. त्यामुळे नाराज झालेले छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यालाही उपस्थिती दर्शवली नाही. छगन भुजबळ हे कालपासून नागपूरच्या रेडिसन्स ब्लू या हॉटेलमध्ये मुक्कामी होते. मात्र, दुसरीकडे पक्षाच्या मेळाव्याला छगन भुजबळ यांनी उपस्थिती दर्शवली नाही.

देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या मंत्र्यांच्या यादीतून छगन भुजबळ यांचा पत्ता कट झाला आहे. भुजबळ यांना मंत्रिपदासाठी कॉल न आल्याने ते नाराज असल्याची चर्चा आहे. मंत्रिपद न मिळाल्याने नाराज छगन भुजबळ यांनी शपथविधी सोहळ्यालाही हजेरी लावली नाही. नाराज झालेले छगन भुजबळ आता कोणता निर्णय घेणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles