Monday, April 22, 2024

महाराष्ट्र सदन घोटाळा, छगन भुजबळांच्या अडचणी वाढल्या? ४ याचिकांवर स्वतंत्र सुनावणी होणार

महाराष्ट्र सदन घोटाळ्यात राज्याचे अन्नपुरवठा मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. मात्र आज झालेल्या सुनावणीत या प्रकरणी चार वेगवेगळ्या याचिकांवर स्वतंत्र सुनावणी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, सर्वोच्च न्यायालयात अंजली दमानिया यांनी महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी दाखल केलेली याचिका निकाली आहे. अशातच अंजली दमानिया यांनी छगन भुजबळ यांना निर्दोष करार देणाऱ्या कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होत नाही म्हणून अंजली दमानिया यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

त्यानुसार आता हे प्रकरण आज मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश मोडक यांच्यासमोर सुनावणीसाठी पार पडली. या सुनावणीत न्यायाधीश मोडक यांनी संपूर्ण प्रकरण जाणून घेतल्यानंतर चार वेगवेगळ्या याचिकांवर स्वतंत्र होणार सुनावणी होणार असल्याचे सांगितले आहे. तसेच या प्रकरणाची पुढील सुनावणी 15 एप्रिल आणि 29 एप्रिल ला स्वतंत्र होणार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles