Monday, March 4, 2024

जीवे मारण्याच्या धमकीनंतर मंत्री छगन भुजबळ म्हणाले…

गेल्या काही दिवसांपासून ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेणारे मंत्री छगन भुजबळ यांना शुक्रवारी (९ फेब्रुवारी) पुन्हा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. भुजबळांच्या नाशिक येथील कार्यालयात हे धमकीचं पत्र आलं. “तुम्हाला जीवे मारण्याची सुपारी घेतली आहे”, असा उल्लेख या पत्रात आहे, यावर बोलताना आज भुजबळ यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली

मला आजवर अनेक जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. तसे प्रयत्न देखील झाले आहेत. पण मी अशा धमक्यांना घाबरत नाही. तसेच ओबीसी समाजासाठी घेतलेली माझी भूमिका मी सोडणार नाही, असं छगन भुजबळ यांनी माध्यमांसमोर ठामपणे सांगितलंय. ते नाशिकमध्ये बोलत होते.मला ठार करण्याचा कट रचण्यासाठी कुठल्या हॉटेलसमोर बैठक झाली. त्यातील गाड्यांचे क्रमांक काय आहेत वगैरे अशी माहिती मी पोलिसांना दिली असून अशा धमक्यांना घाबरून मी माझी भूमिका सोडणार नाही. समाजासाठी लढतच राहणार असंही भुजबळ यांनी ठामपणे सांगितलं आहे.

पूर्वी सुपाऱ्या घेऊन होत असलेले गँगवॉर आपण गृहमंत्री असताना आटोक्यात आले होते, असा उल्लेखही मंत्री छगन भुजबळांनी माध्यमांसमोर केला. हा सध्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मारलेला अप्रत्यक्ष टोला मानला जात आहे. केला आहे. त्यामुळे हा थेट देवेंद्र फडणवीसांना अप्रत्यक्ष टोला मानला जात आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles