Sunday, July 21, 2024

शिंदे सरकारचं महिलांसाठी आणखी एक मोठं गिफ्ट,मंत्री छगन भुजबळ यांची घोषणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने महाराष्ट्रतील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर कागदपत्रांची जमवाजमव महिलांकडून आणि त्यांच्या कुटुंबियांकडून केली जात आहे. अनेक जण रेशन कार्डमध्ये दुरुस्ती करुन घेत आहेत. तसेच रेशन कार्डमध्ये नावे लावणे किंवा कमी करण्याचं देखील काम करत आहेत. या प्रक्रियेसाठी शासनाला अर्जदाराला शुल्क द्यावं लागतं. पण राज्य सरकारने हे शुल्क माफ केलं आहे.मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’योजनेसाठी महिलांना रेशनकार्डमधील नावे कमी करणे व लावणे प्रक्रिया ३१ ऑगस्ट पर्यंत निशुल्क करण्यात आल्याची घोषणा मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. त्यामुळे शिंदे सरकारने आणखी एक गिफ्ट महाराष्ट्रातील महिलांना दिल्याची भावना आता व्यक्त केली जात आहे.

‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी रेशनकार्ड तातडीने द्यावे. तसेच रेशन कार्डसह आवश्यक कागदपत्रांसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा सूचना राज्याचे अन्न,नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी विभागाला दिल्या आहेत. “महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील मुली, महिला यांना सक्षम आणि आत्मनिर्भर करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरू करण्यात आली आहे. योजनेसाठी नावनोंदणी, अर्ज करणे आदी कामांसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत वाढविण्यात आली आहे. या योजनेसाठी रेशनकार्डसह आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने महिलांना रेशनकार्ड आणि इतर आवश्यक कागदपत्रे यंत्रणेने तातडीने उपलब्ध करून देण्यात यावे. अर्जदार महिलेने रेशनकार्डसाठी अर्ज केल्यानंतर त्याची पूर्तता करण्यासाठी कुठलीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही”, असं छगन भुजबळ म्हणाले.

Related Articles

1 COMMENT

  1. वारंवार उपोषण करण्यास सुद्धा बंदी घातली पाहिजे. त्याऐवजी कोर्टात जावून मागण्या केल्या पाहिजेत. बहुजन समाज अल्पसंख्यांक समाजावर अन्याय करत असेल तर इतर सर्व समाजाची संख्या दुप्पट आहे. तरी त्याचा विचार करून मतदान कर ण्याची वेळ आलेली आहे. त्यासाठी प्रदर्शन करण्याची जरुरी नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles