नाशिकमध्ये आज पाचव्या टप्प्यात मतदान होत आहे. यावेळी बोलताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी सर्वांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, उमेदवारीसाठी माझ्या नावाची चर्चा वगैरे हा सगळा आता भूतकाळ झाला आहे. कुठल्याही परिस्थितीत आपला मतदानाचा हक्क बजवा, अशी विनंती त्यांनी मतदारांना केली आहे.
यावेळी बोलताना त्यांनी मतदारांना कांद्याच्या माळा घालून काही होणार नाही, त्यासाठी सत्याग्रह करा असं आवाहन केलं आहे. मतदान केंद्रात कांद्याच्या माळा नेऊन मतदान अधिकारी त्यावर काही करू शकत नाही. त्यामुळे मतदान करा. कांद्याच्या माळा घालून गेलो, म्हणून मतदान करू शकलो नाही असं करू नका. कांद्याच्या माळा आम्हाला दाखवा, जे कोणी राजकारणी आहेत त्यांना दाखवा. राजकारण्यांपुढे सत्याग्रह करा, मतदान अधिकारी काय करणार असं छगन भुजबळ म्हणाले आहेत.