छत्रपती संभाजीनगरमध्ये शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून नववीच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीच्या आत्महत्येने मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी संबंधित शिक्षकास पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून या अल्पवयीन विद्यार्थिनीने जीवन संपवल्याचं समोर आलं आहे.
एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन विद्यार्थीनीला छळल्याचा आरोप या शिक्षकावर केला जात आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ही संतापजनक घटना घडलेली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असं की, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका गावात इयत्ता नववीत शिकणाऱ्या मुलीने १७ मे रोजी आत्महत्या केली होती. परंतु या मुलीच्या आत्महत्येचं कारण स्पष्ट झालेलं
यानंतर पोलिसांनी याप्रकरणी सखोल चौकशी केली. तेव्हा त्यांना या विद्यार्थिनीच्या शाळेच्या बॅगमध्ये संबंधित शिक्षकाचा फोटो असलेलं घड्याळ सापडलं होतं. त्यानंतर तिच्या पालकांनी शिक्षकांविरोधात तक्रार दाखल केली होती. घटनेच्या तेरा दिवसानंतर पोलिसांच्या हाती हा पुरावा लागला होता. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. त्यांनी संबंधित शिक्षकाची चौकशी करण्यास सुरूवात केली. त्यानंतर धक्कादायक खुलासा झाला. या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये संबंधित शिक्षकाविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे.
संबंधित शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. त्यानंतर तिला त्रास देण्यास सुरूवात केल्याचं समोर आलं. त्यामुळे कंटाळलेल्या विद्यार्थिनीने मृत्यूला कवटाळलं. या शिक्षकावर विद्यार्थिनीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक देखील करण्यात आलेली आहे. ही विद्यार्थिनी पंधरा वर्षांची होती. या अल्पवयीन विद्यार्थिनीच्या मृत्युमुळे तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.