Tuesday, February 18, 2025

सैराटची पुनरावृत्ती! मुलीने केला आंतरजातीय विवाह, सासऱ्याने जावयालाचं संपवलं

छत्रपती संभाजीनगरमध्ये आंतरजातिय प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलीचे वडील आणि चुलत भावाने जावयावर चाकूने हल्ला केला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या जावयाचा ११ दिवसानंतर मृत्यू झाला आहे.

आंतरजातिय प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलीचे वडील आणि चुलत भावाने जावयावर चाकूने हल्ला केला होता. यातल जावय गंभीर जखमी झाला होता. इंदिरानगर मध्ये 14 जुलै रोजी घडलेल्या घटनेत अमित मुरलीधर साळुंखे (वय) हा तरुण गंभीर जखमी झाला होता पोट व छातीत खोलवर वार झाल्याने गुरुवारी अमितचा घाटीचा अतिदक्षता विभागात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता, तरीदेखील आरोपींना जवाहर नगर पोलिसांनी अद्याप अटक न केल्याने अमितच्या नातेवाईकांनी काल पोलीस ठाण्यात ठिया मांडला होता.

खाजगी कंपनीत काम करणाऱ्या अमितची लहानपणीची मैत्रिण विद्या सोबत प्रेम संबंध होते मात्र अंतर जातीमुळे विद्याच्या कुटुंबांचा त्यांच्या लग्नास विरोध होता विरोध पत्करून एप्रिल महिन्यात दोघांनी पळून जाऊन लग्न केलं. अमितच्या कुटुंबांनी दोघांना स्वीकारल्याने ते दोन मे रोजी ते घरी परतले होते. त्यानंतर त्यांचा गुण्या गोविंदाने संसार सुरू होता.

मात्र, विद्याच्या कुटुंबीयांच्या मनातला राग गेला नव्हता विद्याचे वडील गीताराम भास्कर कीर्तीशाही व चुलत भाऊ आप्पासाहेब अशोक कीर्तीशाही हे सतत अमितला जीवे मारण्याच्या धमक्या देत होते. 14 जुलै रोजी अमित फिरत असताना गीताराम आप्पासाहेबने त्याच्यावर चाकूने गंभीर वार केले तेव्हापासून त्याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते. गुरुवारी अमितची मृत्यूची झुंज अखेर संपली, अमित वरील हल्ल्याला अकरा दिवस उलटूनही मारेकरी वडील व भावाला जवाहर नगर पोलिसांनी अटक न केल्याने अमितच्या पत्नीसह त्याच्या कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला.

अमितच्या मारेकऱ्यांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेत त्यांच्या कुटुंबीयांनी जवाहरनगर पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला काल होता. रात्री उशिरापर्यंत कुटुंब ठाण्यात ठाण मांडून होते पोलिसांनी मारेकर्‍यांना अटक करण्यात निष्काळजीपणा केल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे. शिवाय सासरा गीताराम व आप्पासाहेब व्यतिरिक्त पाच ते सहा जणांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचे त्यांनी सांगितले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles