Sunday, December 8, 2024

विधानसभेपूर्वी भाजपला मोठा धक्का बसणार; १६ नगरसेवक ठाकरे गटात प्रवेश करणार!

भाजपचे नेते राजू शिंदे हे छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छूक होते. मात्र, हा मतदारसंघ सध्या शिवसेना शिंदे गटाच्या ताब्यात असून संजय शिरसाठ हे विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे राजू शिंदे हे आता थेट ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचं कळतंय.

राजू शिंदे यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी ताकद आहे. त्याचबरोबर भाजपच्या काही नगरसेवकांवर देखील त्यांची चांगलीच पकड आहे. लोकसभा निवडणुकीत आम्ही शिंदे गटाला चांगली मदत करूनही त्यांनी आमचे आभार मानले नाहीत. उलट महायुतीत आम्हीच मोठा भाऊ असल्याचं ते आम्हाला हिणवत असल्याचं राजू शिंदे यांनी म्हटलंय.

तुम्हाला जर एकनाथ शिंदे यांच्याच शिवसेनेसोबत काम करायचं असल्यास आम्ही भाजपमधून बाहेर पडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करून जनतेचे काम करू असंही राजू शिंदे यांनी ठामपणे सांगितलं आहे. आमच्यासोबत भाजपचे बहुतांश कार्यकर्ते देखील असल्याचा दावा राजू शिंदे यांनी केला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles