बिग बॉस मराठीच्या घरात सध्या वेगवेगळे ट्विस्ट येत आहेत. या आठवड्यात बिग बॉसच्या घरात चांगलाच कल्ला झाला. दरम्यान आज रविवारी (8 सप्टेंबर) बिग बॉसच्या घरातून एक सदस्य बाहेर जाणार आहे. सर्वांचा लाडका घन:श्याम दरवडे हा यावेळी बिग बॉसच्या घरातून एलिमिनेट झाला आहे. आजच्या भाऊच्या धक्क्यावर छोट्या पुढारीचा बिग बॉसचा प्रवास संपणार आहे.
घन:श्याम दरवडेचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपला
या आठवड्यात बिग बॉसच्या घरात एकूण सात सदस्य नॉमिनेट झाले होते. घन:श्याम दरवडे, निक्की तांबोळी, आर्या जाधव, अभिजित सावंत, धनंजय पोवार, सूरज चव्हाण, अरबाज पटेल यांचा सावेश होता. यापैकी धनंजय पोवार, अभिजित सावंत यासारखे स्पर्धक अनेकवेळा नॉमिनेट झाले आहेत. पण प्रेक्षकांनी भरभरून वोट दिल्यामुळे ते स्पर्धेत अद्याप कायम टिकून आहेत. यावेळीच्या एलिमिनेशनमध्ये कोणाचा नंबर येणार, याची सर्वांनाच उत्सुकता होती. मात्र यावेळीदेखील आर्या, धनंजय, अभिजित आणि सुरज चव्हाण पुन्हा एकदा वाचले आहेत. या आठवड्यात घन:श्याम दरवडे बिग बॉसच्या घरातून बाहेर पडतोय.
छोटा पुढारी घन:श्याम दरवडेचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपला
- Advertisement -