Wednesday, April 17, 2024

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार,यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या निवडणुकीत देशभरातून 96 कोटी 80 लाख मतदार मतदान करणार आहेत. त्यापैकी 49.7 कोटी पुरुष आणि 47 कोटी महिला मतदार आहेत. तर 48 हजार ट्रान्सजेंडर मतदारही मतदान करणार आहेत. यामध्ये 21 कोटी 50 लाख युवा मतदार आहेत. त्यातही एक कोटी 82 लाख प्रथम मतदारअसणार आहेत. याशिवाय 82 लाख मतदार 85 वर्षांवरील आहेत, तर 2 लाख 18 हजार मतदार हे 100 वर्षांवरील आहेत. या सर्वांसाठी 10 लाख 50 हजार मतदान केंद्रे असणार आहेत. तर 55 लाख ईव्हीएमचा वापर केला जाणार आहे. यासाठी दीड कोटी मतदान अधिकारी आणि सुरक्षा अधिकारी तैनात करण्यात येणार आहेत.
याव्यतिरीक्त प्रत्येक जिल्ह्यात ज्येष्ठ अधिका-यांच्या अखत्यारित 24 तास कंट्रोल रूम सुरू असणार आहे. कुठेही हिंसा होणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे. कोणी मुफ्त वस्तू कोणी वाटत असेल, पैसा वाटप होत असेल तर निवडणूक आयोगाला कळविण्याचे आवाहनही मुख्य निवडणूक आयुक्तांनी केले. या तक्रारीवर 100 मिनिटात कारवाई केली जाईल, असेही आश्वासन त्यांनी दिले. यासोबतच ज्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, त्यांना तीनवेळा न्यूज पेपर, वृत्तवाहिन्यांमध्ये मध्ये माहिती द्यावी लागणार आहे. राजकीय पक्षांनाही तुम्हाला गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेला उमेदवार का मिळाला नाही, याची माहिती द्यावी लागणार आहे.
कुठे पैसा वाटप सुरू असेल , कुठे गैरप्रकार सुरू असतील तर फक्त एक फोटो काढून सी विजील ॲप वर टाका, तुमच्या मोबाईलचे अक्षांश, रेखांश वरून लोकेशन ट्रॅक करून १०० मिनिटात आमची टीम तिथे पोचतील, असं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलं.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles