अहमदनगर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या…. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर
२१३ रिक्त जागा, अर्ज मात्र साडेतीन हजार
अहमदनगर : अडथळ्यांची शर्यत पार करत आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी मनावर घेतल्याने अखेर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्याची प्रक्रिया आज शनिवार (दि. 14) होणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना बदल्याची प्रतिक्षा होती. ती प्रतिक्षा आज संपणार असून 213 रिक्त जागांसाठी आलेल्या 3 हजार 800 अर्जापैकी कोणा कोणाला बदलीची लॉटरी लागणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
लोकसभा निवडणुकीमुळे यंदा गुरूजींच्या बदल्या लांबल्या होत्या. राज्य सरकार अथवा ग्रामविकास विभागाकडून प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांबाबत सुस्पष्ट मार्गदर्शन अथवा आदेश न आल्याने प्रत्येक जिल्हा परिषद पातळीवर वेगवेगळ्या पध्दतीने शिक्षकांच्या बदल्याची अथवा आंतरजिल्हा बदलीने बालेल्या अथवा पवित्र पोर्टलव्दारे नियुक्त शिक्षकांच्या नियुक्तीची प्रक्रिया राबवली. मात्र, नगर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या झालेल्या नव्हत्या. मागील आठवड्यात शिक्षक समन्वय समितीची बैठक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांच्यात बैठक होवून त्यांनी लवकरात लवकर बदल्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. त्यानूसार आज बदल्याची प्रक्रिया होणार आहे.
दरम्यान, यंदा जिल्हातंर्गत बदलीसाठी 3 हजार 800 शिक्षकांनी अर्ज केलेले आहेत. यातील अपात्र आणि बदलीस नकार दिल्यानंतर दीड ते दोन हजार शिक्षक बदलीच्या प्रक्रियेत सहभागी झाल्यास यंदाच्या बदल्या चांगल्याच चुरशीच्या होणार आहेत. दरम्यान बदल्यावरून जिल्ह्यातील गुरूजी चांगलेच धास्तावले आहेत. आधीच्या रिक्त जागांवर नेमणूका मिळवण्याच्या स्पर्धेत आंतरजिल्हा शिक्षकांनी जिल्हातंर्गत बदलीसाठी पात्र असणार्या शिक्षकांवर मात करत नेमणूका पदरात पाडून घेतलेल्या आहेत. त्याच सोबत पवित्र पार्टलवाल्यांची देखील लॉटरी लागली असून यामुळे जिल्हातंर्गत बदलीसाठी प्रयत्न करणारे शिक्षकांची मोठी गोची झालेली आहे. दरम्यान आज होणार्या बदल्यांच्या प्रक्रियेला सकाळी 10 वाजल्यापासून सुरूवात होणार असून यावेळी ऑनलाईन समुपदेशाने प्रक्रिया पारपडणार आहेत. यात संवर्गनिहाय प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, ऊदू माध्यम शिक्षक यांच्या बदल्या होणार आहेत. यावेळी आधीच्या शिक्षकांने एका तालुक्यातून दुसर्या तालुक्यात जाण्यास होकार दिल्यानंतर रिक्त होणार्या जागोवर बदलीसाठी पात्र असणार्या शिक्षकांना संधी मिळणार आहे. जिल्ह्यात अवघ्या 213 मराठी आणि उर्दू माध्यामातील शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत.
नगर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या….मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर
- Advertisement -