Tuesday, April 23, 2024

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली नातवासोबत मुख्यमंत्र्यांनी साजरी रंगपंचमी

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आपल्या ठाणे येथील निवासस्थानी रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली. नातू रुद्राश याच्याकडून रंग लावून घेत त्यांनी रंगपंचमीचा आनंद लुटला. यावेळी त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.यावेळी त्यांची पत्नी सौ.लता शिंदे, मुलगा खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, सून वृषाली शिंदे तसेच नातू रुद्रांश आणि घरातील कर्मचारी सहभागी झाले होते.

यावेळी सर्व राज्यातील जनतेला रंगपंचमीच्या शुभेच्छा देताना कर्मचारी आणि पोलीस बांधवांना गोड खायला घालून मुख्यमंत्र्यांनी या सणाचा आनंद अधिक द्विगुणीत केला. होळी, धूलिवंदनानिमित्त मुख्यमंत्री यांनी शुभेच्छा दिल्या. या सणांच्या उत्सव-उत्साहातून सुख, समृद्धी आणि आनंदांच्या क्षणांची उधळण व्हावी अशी मनोकामना व्यक्त करून पर्यावरणपूरक होळीचे, नैसर्गिंक रंगाच्या वापराचे आवाहन मुख्यमंत्री यांनी केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles