महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पार पडण्यासाठी अवघा एक महिना उरला आहे. महायुतीने पत्रकार परिषद घेऊन सरकारचं रिपोर्ट कार्ड सादर केलं. याच पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी शरद पवारांना आव्हान देत आधी महाविकास आघाडीने चेहरा सांगावा असं विधान केलं होतं. त्यानंतर शरद पवार यांनी एक असं वक्तव्य केलं
शरद पवार पुढे म्हणाले, जयंत पाटील यांनी सात हजार किमीची शिवस्वराज्य यात्रा काढली. तसंच ते सुमारे ७६ मतदारसंघांमध्ये गेले होते. आपलं राज्य विकासाच्या बाबतीत खालच्या क्रमांकावर फेकलं गेलं आहे. जयंत पाटील यांनी राज्याचा दौरा केला आणि त्यांनी लोकांमद्ये आशा पल्लवित केल्या आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून माझी खात्री आहे की ते महाराष्ट्राला योग्य दिशा देतील.