मुलांना शाळेत आणण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, मात्र तरीही आज अशी अनेक मुलं आहेत जी शाळेत येत नाही किंवा त्यांना पालक पाठवत नाहीत. यासाठी सरकारनेही शिक्षकांना घरी पाठवून मुलांना आणि त्यांच्या पालकांना समजवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याचा परिणाम सकारात्मक झाला पण आजही अनेक मुले शाळेत येत नाहीत किंवा त्यांचे पालक त्यांना येऊ देत नाहीत.
तर दुसरीकडे काही मुलं स्वत:चं शाळेत यायचा कंटाळा करतात. दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक विद्यार्थी शाळेत येत नाही म्हणून थेट शिक्षकच त्याच्या काही मित्रांसह त्याच्या घरी पोहोचले. त्यानंतर त्यांनी जे सांगितले ते एकून तुम्हीही शिक्षकांचं कौतुक कराल. तसेच हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही तुमच्या बालपणीची आठवण येईल हे नक्की
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक विद्यार्थी बऱ्याच दिवसांपासून शाळेत येत नाहीये. त्यामुळे शिक्षकांनी त्याला शाळेत आणायचं ठरवलं. यासाठी शिक्षक थेट विद्यार्थ्याच्या घरीच पोहचले आहेत. हे शिक्षक शाळेतल्या काही विद्यार्थ्यांना घेऊन जो मुलगा शाळेत येत नाहीये त्याच्या घरी पोहचले. त्यानंतर त्याला इतर विद्यार्थ्यांच्या मदतीनं पकडलं आणि त्याचे हात आणि पाय पकडून त्याला शाळेत घेऊन आले. या शिक्षकाचं सोशल मीडियावर कौतुक होतं आहे. गावातील लोकांनी हा गमतीदार व्हिडीओ रेकॉर्ड केला असून आता तो व्हायरल होत आहे.
कई दिनों से स्कूल नही जा रहा था बच्चा मास्टर साहेब घर से टांग कर ले गए स्कूल 😂😍 pic.twitter.com/7n0h7T0Rgg
— छपरा जिला 🇮🇳 (@ChapraZila) November 10, 2023