आपण सगळेच नूडल्स आवडीने खातो, सर्वच जण त्याच्यावर ताव मारताना दिसतात. मात्र, हेच नूडल्स बनवतानाचा एक किळसवाणा प्रकार सध्या समोर आला आहे. या नूडल्समध्ये अशी गोष्ट आढळली आहे, जी पाहिल्यावर कदाचित तुम्ही ते खाण्याचं धाडस पुन्हा करणार नाही,. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, सुरुवातीपासून नूडल्स तयार करण्याची प्रक्रिया दाखवण्यात आली आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, लाकडी फळीवर नूडल्स पसरवलेले दिसते. विशेष म्हणजे त्या नूडल्समध्ये मोठे किडे आढळले आहेत, जे पाहून कोणाच्याही मनात अस्वस्थता निर्माण होईल. धक्कादायक बाब म्हणजे हेच चाऊमीन लोकांना खायला दिले जात आहेत. त्या ठिकाणी आजूबाजूला संपूर्ण अस्वच्छता दिसत आहे. हेच नूडल्स आता रस्त्याच्या कडेला चायनीजच्या गाड्यांवर जाणार आणि तिथून आपल्या पोटात. तुम्हीही हा व्हिडीओ पाहा आणि ठरवा यापुढे नूडल्स खायचे की नाही.
- Advertisement -