गेले कित्येक वर्षे सुरू असलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम हे नेहमीच वादग्रस्त ठरले आहे. आता रत्नागिरी जिल्हयात चिपळूण येथे बहादूर शेख नाका येथे सुरू असलेल्या उड्डाण पुलाच्या बांधकामाचा चाळीस मीटरचा भाग कोसळल्याच राष्ट्रीय महामार्गाच्या अभियंत्यांकडून सांगितले जात असले तरी प्रथमदर्शनी हा १५० ते २०० मीटरचा मोठा भाग कोसळल्याच दिसत आहे. पुलाचा हा भाग कोसळल्यानंतर मोठा आवाज झाल्याने या मोठ्या दुर्घटनेनंतर परिसरात काहीकाळ भीतीचं वातावरण होतं, अशी माहिती येथील नागरिकांनी दिली. १६ ऑक्टोबर रोजी सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास ही मोठी दुर्घटना घडली आहे. सोमवारी सकाळी ७ वा दरम्यान पुलाचा काही भाग मोठा आवाज करत कोसळला होता. त्यानंतर अवघ्या काही तासात पुन्हा एकदा ही मोठी दुर्घटना घडली आहे.
https://x.com/AAPMaharashtra/status/1714108806505140286?s=20
मोठी दुर्घटना…चिपळूणमधील उड्डाणपुलाचा भाग कोसळला, भीतीचं वातावरण..Video
- Advertisement -