Friday, June 14, 2024

राहुल झावरेकडून गर्भवती महिलेला शिवीगाळ, चित्रा वाघ यांचा गंभीर आरोप…व्हिडिओ

नगर दि.८ -नगर दक्षिण मतदार संघाचे खासदार निलेश लंके यांचे समर्थक राहूल झावरे यांनी राक्षसी पध्दतीने विजय साजरा करण्यास केलेली सुरूवात ही सता डोक्यात गेल्याचे लक्षण असून, मोठ्या ताई त्यांना शिक्षा देणार की पाठीशी घालणार ॽअसा खोचक सवाल भारतीय जनता पक्षाच्या महीला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी उपस्थित केला.

पारनेर तालुक्यातील दलित समाजातील महीलेस निलेश लंके समर्थक राहूल झावरे आणि त्यांच्या समर्थकांनी घरात जावून जातीवाचक शिवीगाळ आणि पोटात लाथा मारून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.या घटनेचे तीव्र पडसाद जिल्ह्यात आणि राज्यात उमटले आहेत.

या घटनेबाबत भाजपाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी तीव्र संताप व्यक्त केला.निलेश लंके यांचे समर्थक राक्षसी पध्दतीने आपला विजय साजरा करीत आहे.महायुतीचे उमेदवार डाॅ सुजय विखे पाटील यांचा प्रचार केला म्हणून हल्ले करणार्या लंके समर्थकांना ‘मोठी ताई’ पाठीशी घालणार की शिक्षा देणार असा खोचक सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला.

निवडणुकीतील विजय पचवता आला पाहीजे आणि मिरवताही आला पाहीजे,सतेची हवा आणि माज इतका डोक्यात गेला असेल तर शिवरायांच्या पावनभूमीत तो कधीही सहन केला जाणार नाही.जिजाउच्या लेकीच औरंग्याच्या अवलादींना धडा शिकवतील असा इशारा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी दिला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles