चित्रकूट गुरूकुल’च्या हर्षिता हंगे हिचा नर्सरी कविता वाचनाचा राष्ट्रीय वर्ल्ड रेकॉर्ड
राष्ट्रीय पातळीवर विक्रमी कामगिरी करणारी नगरमधील पहिलीच प्री स्कूलमधील विद्यार्थीनी
नगर: नगरमधील चित्रकूट गुरुकुल प्री स्कूलमधील युकेजीची विद्यार्थीनी हर्षिता हंगे हिने १५ नर्सरी कविता फक्त तीन मिनिटांत एकापाठोपाठ एक म्हणत राष्ट्रीय वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे. असा विक्रम करणारी ती नगरमधील पहिलीच प्री स्कूलमधील विद्यार्थीनी ठरली आहे. प्राचार्या सारीका आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली तिने ही कामगिरी करून गुरूकुलसह नगरचे नाव रोशन केले आहे.
या यशाबद्दल हर्षिता हंगे हिचा कौतुक सोहळा सावेडी नाका येथील चित्रकूट गुरूकुलमध्ये पार पडला. तिचा प्रमुख अतिथी दिप्ती सबलोक, सुभाष चव्हाण यांच्या हस्ते वर्ल्ड रेकॉर्ड सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, मेडल
देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी हर्षिताचे पालक अनुराधा हंगे, हेमंत हंगे, संस्थेचे डायरेक्ट संजय चव्हाण, चित्रकूट इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या पूजा गुरबक्ष, प्राचार्या सारीका आनंद, शिक्षिका हर्षदा गायकवाड, हिमानी आल्हाट आदी उपस्थित होते.
प्राचार्या सारीका आनंद म्हणाल्या, हर्षिता हिचे यश चित्रकूट गुरूकुलसाठी मोठा बहुमान आहे. आई वडीलांची प्रेरणा, शाळेतून मिळालेले प्रोत्साहन यामुळे तिने अतिशय कमी वयात मोठी देदीप्यमान कामगिरी केली आहे. सलग पंधरा नर्सरी कविता अगदी तीन मिनिटांत वाचणे तिच्या वयाच्या विद्यार्थीसाठी आव्हानात्मक आहे. तिने हे आव्हान यशस्वीपणे पेलून परिवाराचा, शाळेचा नावलौकिक वाढवला आहे.
प्रमुख पाहुण्यांनी चित्रकूट गुरूकुलमधील शिक्षण पद्धती प्राचीन भारतीय संस्कृती आणि आधुनिक शिक्षणाचा सुंदर मिलाफ असल्याचे सांगत हर्षिताचे कौतुक केले. हर्षिताचे पालकांनीही या यशाबद्दल शाळेतील गुणवत्ता पूर्ण शिक्षण पद्धतीचे कौतुक केले.