एक पार चक्रावून टाकणारा पदार्थ समोर आला आहे. या पदार्थाला चॉकलेट समोसा पाव असं म्हणतात. आता समोसा म्हटलं तर एक मसालेदार पदार्थ डोळ्यांसमोर येतो. पण जर कोणी त्यामध्ये चॉकलेट घातलं तर काय होईल? हे जाणून घेण्यासाठी हा अनोखा पदार्थ तुम्ही देखील पाहाच. सर्वात आधी एक पाव घेतला त्याला मध्यभागी फाडून त्यामध्ये चॉकलेट सिरप टाकलं. त्यानंतर पावामध्ये एक समोसा ठेवला. मग या समोस्यावर सुद्धा भरपूर प्रमाणात चॉकलेट टाकलं अन् अशा पद्धतीनं तयार झाला चॉकलेट समोसा पाव. समोसा हा तिखट मसालेदार पदार्थ आहे. आणि चॉकलेट सिरप हा गोड पदार्थ आहे. आता या दोन चवी एकत्र केल्यानंतर काय घडलं असेल हे तर देवच जाणो.
- Advertisement -