देशात नागरिकत्व कायदा लागू झाल्यानंतर अनेकांना भारताचे नागरिकत्व देण्यात आले आहे. रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी CAA अंतर्गत 188 पाकिस्तानी हिंदूंना भारतीय नागरिकत्व दिले. अहमदाबादमध्ये आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी भारताच्या शेजारील देशातील हिंदूंच्या परिस्थितीवरही भाष्य केले.यावेळी अमित शाह म्हणतात, “बांग्लादेशात फाळणी झाली, तेव्हा तिथे 27 टक्के हिंदू होते, आज 9 टक्के शिल्लक आहेत. हिंदू गेले कुठे? आम्ही 2019 मध्ये CAA आणला, ज्यामुळे करोडो हिंदू, जैन आणि शीख धर्माच्या लोकांना नागरिकत्व मिळाले. इंडिया आघाडी CAA बाबत मुस्लिमांना भडकावण्याचे काम करत आहे. CAA कायदा कोणाचेही नागरिकत्व हिरावून घेत नाही. काही राज्य सरकारे CAA बद्दल लोकांची दिशाभूल करत आहेत.”
- Advertisement -