शेवगाव तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून हा वाद सुरू होता. मात्र कालांतराने वाद हाणामारीत गेला यात तिघे जण जखमी झाले. या मारहाणीत दोन महिला एका पुरुषाचा समावेश आहे. शेवगाव तालुक्यातील कांबी शिवारात शेतातील बांधाच्या वादावरून दोन गटांमध्ये हाणामारी झाली. या दोन्ही गटाने एकमेकांच्या विरोधात शेवगाव पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल केले आहे.
त्यामध्ये जयश्री दत्तात्रय काटमोरे आणि पार्वती भाऊसाहेब घोलप या दोन्ही महिलांनी फिर्याद दाखल केल्या आहे. जयश्री दत्तात्रय काटमोरे यांनी दिलेल्या फिर्यादीत भाऊसाहेब मारुती घोलप आणि त्यांचा मुलगा ईश्वर भाऊसाहेब घोलप यांनी लोखंडी पाईपने व दगडाच्या सहाय्याने जयश्री दत्तात्रय काटमोरे, दत्तात्रय लक्ष्मण काटमोरे यांना मारहाण करून जखमी केल्याचे नमूद केले आहे. जयश्री दत्तात्रेय काटमोरे यांच्या तक्रारीवरून भाऊसाहेब मारुती घोलप आणि ईश्वर भाऊसाहेब घोलप यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३२४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर घोलप गटाकडून पार्वती भाऊसाहेब घोलप यांनी दिलेल्या फिर्यादीत विवेक दत्तात्रय काटमोरे, पायल दत्तात्रय काटमोरे, जयश्री दत्तात्रय काटमोरे व दत्तात्रय लक्ष्मण काटमोरे यांनी लाथा बुक्क्यांनी व दगडाने मारहाण करून पार्वती भाऊसाहेब घोलप, भाऊसाहेब मारुती घोलप व ईश्वर भाऊसाहेब घोलप यांना जखमी केले असे नमूद केले आहे. तर पार्वती भाऊसाहेब घोलप यांच्या तक्रारीवरून दत्तात्रेय लक्ष्मण काटमोरे, जयश्री दत्तात्रेय काटमोरे यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३२४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पायल दत्तात्रेय काटमोरे, विवेक दत्तात्रेय काटमोरे यांच्यावर भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जमिनीचा वाद; दोन कुटुंबात तुफान हाणामारी, नगर जिल्ह्यातील घटना….
- Advertisement -