Wednesday, April 30, 2025

नगर तालुक्यातील दोन गटात तुफान हाणामारी, परस्परविरोधी गून्हे दाखल

अहमदनगर : नागरदेवळे (ता. नगर)येथे दोन गटांत शिवीगाळ करत हाणामारी झाल्याची घटना मंगळवारी (दि. २) रात्री घडली. या प्रकरणी दोन्ही गटांकडून फिर्याद देण्यात आली असून, परस्परविरोधी गुन्हे भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. या घटनेमुळे गावात काही वेळ तणाव निर्माण झाला होता.दरम्यान, गावात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

लियाकत शेख यांच्या फिर्यादीवरून अभिजित धाडगे, पुष्कर शेलार, उदय शेलार व इतर सात ते आठ जणांवर, तर संतोष शेलार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उजेर लियाकत शेख, उमेर लियाकत शेख व तालुक्यातील नागरदेवळे येथे किरकोळ कारणातून दोन गटांत हाणामारी झाली. दोन गट समोरासमोर आले. लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना घडल्याने गावात काही वेळ तणावाचे वातावरण होते. दरम्यान,भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दिनकर मुंढे यांच्यासह पथकाने नागरदेवळे गावात धाव घेतली. पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने गावातील वातावरण निवाळले.
हाणामारीत जखमी झालेल्या दोघांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. तेथून त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles