Friday, February 23, 2024

अहमदनगर जिल्ह्यात ग्रामसभेत मोठा गोंधळ, भाजपा जिल्हाध्यक्ष आक्रमक….

नगर तालुक्यातील वाळकी येथे झालेल्या ग्रामसभेत विरोधकांनी पाणी प्रश्न व विकास कामाच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले . विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नाला सत्ताधाऱ्यांनी समाधानकारक उत्तरे देता न आल्याने विरोधक आक्रमक झाल्याने ग्रामसभा वादळी ठरली .
वाळकीतील पाणी प्रश्न व विकास कामाबाबत विशेष ग्रामसभा घेण्यात आली होती . उन्हाळ्याची चाहुल लागण्याआधीच येथील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे . नागरिकांना महिन्यातून एकदा पाणी मिळत आहे . पाणीटंचाईमुळे ग्रामस्थ मेटाकुटीला आले असताना सत्ताधारी काय करतात ? असा प्रश्न भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी उपस्थित केला . नागरिकांच्या पाण्याची व्यवस्था करण्याचे काम सत्ताधाऱ्यांचे असताना याबाबत त्यांच्याकडून चालढकल केली जात आहे . घोसपुरी योजनेत पाण्याची कमतरता नसताना सत्ताधारी नागरिकांना मुबलक पाणी का देत नाही . नागरिकांच्या पाणी प्रश्नावर भालसिंग आक्रमक झाल्याने ग्रामस्थांनीही पाण्याविषयीच्या तक्रारी ग्रामसभेत मांडल्या .
पंचायत समितीचे माजी उपसभापती आक्रमक होत सरपंच , ग्रामविकास अधिकारी यांना धारेवर धरत ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता सरपंच , ग्रामविकास अधिकारी गावचा कारभार मनमानी पद्धतीने करत असल्याचा आरोप केला . गावात सध्या साथीचे रोग पसरले आहेत . गावात फवारणी करण्यासाठी ग्रामपंचायतने फॉगिंग मशिन खरेदी केले . मात्र फॉगिंग मशिनच गायब झाले आहे . त्याच्या खरेदीसाठी बाजारात किती रक्कम आहे ? अन् बील कितीचे दिले . यामध्ये मोठीच तफावत जाणवत असून त्याची चौकशीच करून सत्यता जनतेसमोर मांडण्याचे सत्ताधाऱ्यांना ठणकावले .
विरोधकांच्या समर्थकांना अजूनही पाणी , वीज यापासून सत्ताधाऱ्यांनी वंचित ठेवले आहे . गावचा सरपंच या नात्याने सर्व नागरिकांना सुख सुविधा पुरविणे गरजेचे असताना त्यांच्याकडून जाणीवपुर्वक राजकीय आकसापोटी ठराविक नागरिकांना पाणी व वीज यापासून वंचित ठेवले जात आहे . नदीची झालेली गटारगंगा , स्मशान भूमीची दुदर्शा याबाबत निमसे यांनी आक्रमक होत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले .
गावात विकासकामे करताना सदस्यांना विश्वासात घेतले जात नाही . एकाच ठेकेदाराला कामे दिली जात असून टेंडर नोटिस जे वृत्तपत्र नागरिकांच्या हातीच पडत नाही अशा वृत्तपत्रामध्ये टेंडर नोटीस प्रसिद्ध का केली जाते अशा प्रश्न ग्रामपंचायत सदस्य ओंकार निमसे यांनी उपस्थित करत ठेकेदार , ग्रामविकास अधिकारी आणि सरपंच यांची मिलीभगत असल्याचा आरोप त्यांनी केला .
ग्रामसभेत भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग , मा . उपसभापती रंगनाथ निमसे यांनी आक्रमक होत विविध प्रश्नावरून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले . ग्रामस्थ आशिष कासार , गणेश भालसिंग , अरुण कासार , अंबादास भालसिंग , लक्ष्मण गोरे आदींसह ग्रामस्थांनी भेडसावणाऱ्या समस्या आक्रमकपणे मांडल्या .
विरोधकांनी आक्रमकपणे सत्ताधाऱ्यांना पाणी प्रश्न , विविध विकास कामांच्या प्रश्नावरून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले . पाणी प्रश्नावरून ग्रामसभा वादळी ठरली .

देवा शपथ सर्वांना विश्वात घेणार
गावातील विकास कामे करताना सदस्यांना विश्वासात न घेता परस्पर कामे केली जात आहेत . सत्ताधारी विरोधी सदस्यांच्या वार्डामधील विकास कामांसाठी निधी खर्च करत नासून सत्ताधारी त्यांच्याच सदस्यांच्या वार्डामध्ये निधी खर्च करत आहेत . सरपंच , ग्रामविकास अधिकारी दोघेच गावचा कारभार पाहतात कसे ? असा प्रश्न विरोधी सदस्यांनी उपस्थित केल्याने ग्रामविकास अधिकारी यांनी ‘ देवा शपथ ‘ यापुढे सर्वांना विश्वासात घेऊन काम करण्याची शपथ घेतली .

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles