Sunday, February 9, 2025

व्हॉट्सअ‍ॅपवर आलेल्या कस्टमर सपोर्ट एपीके फाईलवर क्लिक, अहमदनगर मधील तरुणाची ऑनलाईन फसवणूक

अहमदनगर-अनोळखी नंबरवरून व्हॉट्सअ‍ॅपवर आलेल्या कस्टमर सपोर्ट एपीके फाईलवर क्लिक केल्यानंतर वेगवेगळ्या पाच बँकांच्या के्रडिट कार्डवरून कोणताही ओटीपी न देता एक लाख 80 हजार 413 रुपये डेबिट झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी केशव निवृत्ती सानप (वय 30 रा. रभाजीनगर, केडगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सानप पाच वेगवेगळ्या बँकांचे के्रडिट कार्ड वापरतात. ते 10 जून रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास घरी असताना त्यांना त्यांच्या मोबाईलवरील व्हॉट्सअ‍ॅपवर अनोळखी व्हॉट्सअ‍ॅप नंबरवरून कस्टमर सपोर्ट एपीके फाईल आली. त्यांनी ती फाईल पाहण्यासाठी त्यावर क्लिक केले. क्लिक करताच त्यांच्या मोबाईलवर ओटीपी आले. त्यानंतर त्यांच्या एस बँकेच्या क्रेडिट कार्डवरून तीन हजार दोन रुपये डेबिट झाले.

त्यानंतर त्यांच्या एचडीएफसी, एयु, आयसीआयसीआय, एसबीआय अशा बँक खात्याच्या क्रेडिट कार्डमधून टप्प्याटप्याने एकूण एक लाख 80 हजार 413 रूपये डेबिट झाल्याचे मेसेज आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्ष्यात आल्यानंतर सानप यांनी बुधवारी (12 जून) कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles