Friday, December 1, 2023

छगन भुजबळ यांना मोठा धक्का, जरांगेंवरील टीका भोवली…. बड्या नेत्याने सोडली साथ

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाचा ओबीसीत समाजात समावेश करण्याची आणि मराठ्यांना आरक्षण देण्याची जोरदार मागणी केली आहे. जरांगे पाटील यांच्या या मागणीला राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं. आमचा त्याला विरोध नाही. पण ओबीसीतून त्यांना आरक्षण देऊ नये. आमचा त्याला विरोध राहील, असं छगन भुजबळ यांनी वारंवार सांगितलं. जरांगे पाटील यांनी यावरून भुजबळांना प्रत्येक सभेत टार्गेट केलं. भुजबळ यांची ही विधाने त्यांच्या चांगलीच अंगलट आली आहेत. भुजबळांच्या समर्थक मराठा पदाधिकाऱ्यांनी बंडाचं निशाण फडकवल्याने भुजबळांची डोकेदुखी वाढली आहे.

छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाविरोधात भूमिका घेतल्याने भुजबळांना मोठा धक्का बसला आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांनी भुजबळांची साथ सोडली आहे. जयदत्त होळकर हे भुजबळांचे खंदे समर्थक आहेत. त्यांनीच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भुजबळांची साथ सोडल्याने भुजबळांच्या अडचणी वाढल्या आहेत
जयदत्त होळकर हे राष्ट्रवादीचे प्रांतिक सरचिटणीस आहेत. त्यांनी या पदाचाही राजीनामा दिला आहे. मराठा आरक्षणाला मंत्री भुजबळ विरोध करत असल्याने मी राजीनामा दिला आहे. निफाड तालुका पूर्व 46 गाव तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. पुढे आता फक्त मराठा समाजासाठी काम करण्याची भूमिका घेतली आहे. मराठा समाजाचा झेंडा हाती घेतला आहे, अशी प्रतिक्रिया होळकर यांनी व्यक्त केली आहे.

भुजबळ यांचे समर्थक असलेल्या मराठा नेत्यांनीच भुजबळांच्या विरोधात उघड भूमिका घेतली आहे. थेट राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत लासलगावसह 46 गावातून मतांची गोळबेरीज करताना होणार भुजबळांची चांगलीच दमछाक होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

%d bloggers like this: