राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात फाईलींच्या सह्यावरून मोठा वाद झाल्याची माहिती आहे. नगरविकास खात्याची फाईल पूर्णपणे वाचल्याशिवाय मी सही करणार नाही अशी भूमिका अजित पवारांनी घेतली. त्यावर तुमच्याकडून आलेल्या फाईलींवर मीही सह्या करणार नाही असं मुख्यमंत्री म्हणाले. या दोघांनीही घेतलेल्या भूमिकेनंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही मिनिटांसाठी तणावपूर्ण शांतता निर्माण झाली. मात्र हा विषय संपल्यानंतर मंत्रीमंडळ बैठक पुन्हा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
आधीच अजित पवार गटाच्या नेत्यांच्या फाईल मुख्यमंत्री कार्यालयात अडवण्यात आल्याच्या बातम्या येत आहेत. आता त्यात अजितदादांनीही मुख्यमंत्र्यांच्या नगरविकास खात्याच्या फाईलवर वाचल्याशिवाय सही करणार नाही अशी भूमिका घेतली. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारमधील अंतर्गत धूसफूस बाहेर आल्याचं दिसतंय.